image
काय आहे गिग इकॉनॉमी ?

गिग म्हणजे एखाद्या व्यावसायिकाने घेतलेला एखादा प्रकल्प किंवा कामाचा करार असतो व हे काम निश्चित काळात पूर्ण करावे लागते. यासाठी कार्यालयातून किंवा ऑनसाइट (रिमोट लोकेशनवर) काम करू शकता. गिग इकॉनॉमीत आज नवनवीन नोकऱ्या समाविष्ट केल्या जात आहेत. ही एक ऑन-डिमांड इकॉनॉमी आहे, ज्यात व्यक्ती कामाचे वेळापत्रक स्वत:च तयार करू शकते. सोबतच असाइनमेंट लोकेशन व स्थळ निवडीचे स्वातंत्र्यही यात व्यक्तीला असते. काही काळापासून हे क्षेत्र भारत व जगभरात लोकप्रिय होत आहे.

नोकरीच्या मुख्य संधी
आज ग्रॅब, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांचे मोबाइल अॅप्स व स्विगी, फूडपांडा, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज, ईबे आदी ई-कॉमर्स संकेतस्थळे नोकरीच्या संधी देताहेत. फ्लेक्सीऑर्ग डॉट कॉम, गेटमीएक्स्पर्ट‌्स डॉट कॉम आदी पोर्टल्स उमेदवारांना अशा कंपन्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. भारतात कंटेंट रायटिंग, भाषांतर, निवड, विक्री, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्किटेक्चर, बीआयएम, अकाउंटिंग, डेटा अॅनालिटिक्स, कन्सल्टिंग, काउन्सेलिंग आदी गिग जॉब्ज उपलब्ध होत आहेत.

करिअरमध्ये असे फायद्याचे ठरतात गिग जॉब्स
या क्षेत्रात व्यक्ती अनेक संस्थांसाठी काम करते. येथे ती व्यक्ती महिला की पुरुष? याच्या आधारे निवड किंवा करार केले जात नाहीत. ही नोकरी सहजपणे उपलब्ध होण्यासोबतच कमी खर्चाची व सुरक्षित असून येथे आपण व्यवसायाशी संबंधित शिक्षणही घेऊ शकतो. तसेच यात अनेक जबाबदाऱ्यांसह लवचीकताही मिळत असते.

दोन प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध
कायमस्वरूपी नोकरी : गिग इकॉनॉमीत व्यक्तीकडे काम करण्याची लवचीकता असते. यामुळे अल्पकालीन व दीर्घकालीन प्रकल्पही मिळतात. तसेच त्यांचे मानधन मिळण्यातही काही अडचण येत नाही. याशिवाय येथे चांगल्या भवितव्याच्या उत्तम संधीही मिळतात.

अल्पकालीन नोकरी : अल्पकाळासाठी काम करायचे असल्यास हा तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सिद्ध होईल. येथे व्यक्ती तासांच्या हिशेबाने काम करून चांगली कमाई करू शकते.

सर्वाधिक इन्कम असणारी गिग क्षेत्रे
डीप लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, एथिकल हॅकिंग, बिटकॉइन, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस- लॅम्बडा, व्हर्च्युअल रिअॅलिटी, रिअॅक्ट जे.एस., फायनल कट प्रो-एक्स, इन्स्टाग्राम मार्केटिंग.

ही कौशल्ये गरजेची

ग्रोथ माइंडसेट : कठोर परिश्रम करण्यासह चांगली रणनीती तयार करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकते.

उत्तम कौशल्ये : या क्षेत्रात प्रवेशासाठी पुस्तकी ज्ञानाशिवाय टीमवर्क, संवाद कौशल्य आदी नेतृत्वासाठी लागणाऱ्या कौशल्यांसह सॉफ्ट स्किल्सही असणे आवश्यक आहे.

उद्योग क्षेत्रांची माहिती : या क्षेत्रात प्रवेशासाठी तुम्हाला हेल्थकेअर, रिअल इस्टेट, स्मार्ट सिटीज आदी क्षेत्रांची जास्तीत जास्त मिळवून अपडेट राहावे लागेल.

मेंटर्सना प्रश्न विचारणे ठरेल फायदेशीर
फेसबुक व ट्विटरसारख्या कंपन्यांत काम करणाऱ्या सीनियर्सच्या मते स्मार्ट कर्मचारी त्यांच्या मेंटर्सना अनेक रंजक प्रश्न विचारतात, जे त्या दोघांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. एखाद्याने त्याच्या मेंटरला चुकांबाबत प्रश्न विचारल्यास त्यालाही त्याची मदत करण्यात आवड निर्माण होते. आयबीएम फूड ट्रस्टच्या संचालक सुजेन लिविंग्स्टन मानतात की, अशा प्रश्नोत्तरात मेंटर तुमच्यातील उणिवा व त्यावरील उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही किती कमाई करतात? हा असाच एक प्रश्न आहे. ट्विटरच्या पार्टनरशिप सोल्युशनच्या ग्लोबल हेड लारा कोहेन यांच्या मते कुणालाही असा प्रश्न विचारणे कठीणच असते; परंतु यातून निगोशिएशन करण्यासह स्वत:ची किंमत समजते, तर मेंटर्सकडून आपण स्वत:चा फीडबॅकही मिळवू शकतो, फेसबुक मार्केटप्लेसच्या उपाध्यक्ष डेब लियू सांगतात.

गिग इकॉनॉमी :
वर्ष २०२२ पर्यंत ही इकॉनॉमी २५ ते ३० % जॉब मार्केटला कव्हर करेल, असे मानले जात आहे.
56 % जॉब होल्डर्स असे आहेत, जे स्वत:ची नोकरी सोडण्याचा विचार करताहेत.
83 % जॉब होल्डर्स असे आहेत, जे आंत्रप्रेन्योर्स बनण्याचा विचार करताहेत.



• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.