image
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांना गोळीबार .

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांना गोळीबार केला. त्यानंतर शिंजो आबे यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. शिंजो यांना छातीत गोळी लागली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Shinzo Abe Death) झाल्याचे वृत्त समोर येत आहे. हल्लेखोराला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिंजो आबे (वय- 67 वर्षे) यांच्यावर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

नारा प्रांतातील एका सभेला संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्लेखोरांना गोळीबार केला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.य परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी नारा येथे एका सभेला संबोधित करत होते. तितक्यात त्यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला. शिंजो यांच्या छातीत गोळी लागली. ते जमिनीवर कोसळताच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. शिंजो आबे यांच्या छाती आणि मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावर होत होता.

दरम्यान, जपान हा असा देश आहे, की तिथे हिंसाचाराच्या घटना फार कमी घडतात. तिथे हॅंडगनवर प्रतिबंध आहेत. शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.



• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.